नांद्राजवळ बसच्या धडकेत महिला ठार

By Admin | Updated: May 27, 2017 15:01 IST2017-05-27T15:01:05+5:302017-05-27T15:01:05+5:30

खाजगी बस पोलिसांनी घेतली ताब्यात

The woman was killed in a bus near Nandra | नांद्राजवळ बसच्या धडकेत महिला ठार

नांद्राजवळ बसच्या धडकेत महिला ठार

ऑनलाईन लोकमत

पाचोरा,दि.27- तालुक्यातील  नांद्रा बस स्थानकावर ट्रॅव्हल्सच्या बसची महिलेस धडक बसून ती जागीच ठार झाली. ही दुर्घटना 27 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली.
सुमन लक्ष्मण शिंदे (वय 67) ही महिला ट्रॅव्हल्स बस  एम. एच. 19 जे. 1554) हिने प्रवास करून नांद्रा येथे उतरली. रस्ता ओलांडताना त्याच बसची धडक बसून ती जागीच मरण पावली. सदर महिला ही माहेजी गावची रहिवासी आहे. नांद्रा येथे उतरून ती तिच्या गावी जाणार होती. या घटनेबाबत पाचोरा पो स्टे ला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महिलेचा मुलगा बाहेरगावाहून हजर झाल्यावर पुढील कार्यवाई होणार आहे. पोलिसानी ट्रॅव्हल्स बस ताब्यात घेतली आहे.

Web Title: The woman was killed in a bus near Nandra