महिलेने पाच तोळे सोने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 12:52 IST2017-08-21T12:50:18+5:302017-08-21T12:52:53+5:30
प्रामाणिकपणाचे हातेय सर्वत्र कौतुक

महिलेने पाच तोळे सोने केले परत
ठळक मुद्देदुधाच्या बरणीत राहिले होते सोन्याचे दागिनेदागिन्यांची किंमत दीड लाख रूपयेसंबंधित परिवाराने महिलेचे मानले आभार
आ नलाईन लोकमत कळमसरे, ता.अमळनेर , दि...२१ :गाईचे दूध विकत घ्यायला आलेल्या इसमाचे सुमारे दीड लाख रूपये किंमतीचे पाच तोळे सोने दुधाच्या बरणीत तसेच राहून गेले होते. मात्र कळमसरे येथील महिलेने हे सोने संबंधिताला घरपोच जाऊन परत केल्याची सुखद घटना घडली.रिना जितेंद्रसिंग राजपूत असे या महिलेचे नाव असून, सिसोदिया कुटुंबातील त्या धाकट्या सुनबाई आणि अमळनेर तालुका शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष व कळमसरे ग्रा.प.चे उपसरपंच जितेंद्रसिंग उर्फ पिंटू राजपूत यांच्या त्या सुविद्य पत्नी होत.दिलीप हिराचंद छाजेड हे रविवारी त्यांच्याकडे गाईचे दूध विकत घेण्यासाठी गेले होते. दूधाच्या बरणीत ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या व गळ्यातील हार ते बरणीतच विसरले होते.रिना राजपूत यांच्या लक्षात ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ दिलीप छाजेड यांच्या घरी जाऊन ते सोन्याचे दागिने परत केले. छाजेड परिवाराने त्यांचे आभार मानले.