महिलेने डोक्यात मारला भाजीचा लोखंडी चमचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:34+5:302020-12-04T04:42:34+5:30
जळगाव : भागील भांडणाच्या कारणावरून नसरीन बी शेख वसीम (२८, रा. शाहुनगर) या महिलेच्या डोक्यात शेजारी राहणा-या महिलेने ...

महिलेने डोक्यात मारला भाजीचा लोखंडी चमचा
जळगाव : भागील भांडणाच्या कारणावरून नसरीन बी शेख वसीम (२८, रा. शाहुनगर) या महिलेच्या डोक्यात शेजारी राहणा-या महिलेने लोखंडी चमचा मारून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शाहुनगरात घडली. याप्रकरणी परवीन बी शेख वसीम या महिलेविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहुनगरात नसरीन बी शेख वसीम व परवीन बी शेख वसील या दोन्ही महिला शेजारी-शेजारी राहतात. मंगळवारी रात्री या दोन्ही महिलांमध्ये मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात परवीन हिने घरातील भाजीचा लोखंडी चमचा आणून तो नसरीन हिच्या डोक्यात मारला. यात नसरीन ही गंभीर जखमी झाली. उपचार घेतल्यानंतर बुधवारी शहर पोलीस ठाण्यात नसरीन हिने दिलेल्या तक्रारीनुसार परवीन बी शेख वसीम (रा. शाहुनगर) हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.