महिलेला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-10-01T00:28:16+5:302015-10-01T00:28:16+5:30

जळगाव : अनैतिक संबंध असलेल्या पुरुषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दाखल गुन्ह्यात यशोदाबाई देवीदास भौजिया या महिलेला न्या.प्रीतीकुमार घुले यांनी सात वर्ष सक्त मजुरी सुनावली.

The woman has been sentenced to seven years in the case of strict wages | महिलेला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

महिलेला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

जळगाव : अनैतिक संबंध असलेल्या पुरुषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दाखल गुन्ह्यात यशोदाबाई देवीदास भौजिया (वय 40, रा.अहमदाबाद) या महिलेला न्या.प्रीतीकुमार घुले यांनी बुधवारी सात वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

अहमदाबाद येथील मूळ रहिवाशी असलेली यशोदाबाई भौजिया ही भडगाव येथे मसाला विक्रीचे काम करीत असताना शिव कॉलनीत राहणा:या उमेश अशोक पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध व त्यानंतर अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यातून तिने उमेश याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती.

पैसे दिले नाहीत तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने उमेश याने 15 मे 2015 रोजी आत्महत्या केली होती.

उमेशच्या प}ीने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला यशोदाबाई हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

14 जुलै 2015 रोजी न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाले होते. बुधवारी या खटल्याचा निकाल देण्यात आला. सरकार पक्षातर्फे अॅड.गोपाळ जळमकर यांनी काम पाहिले.

Web Title: The woman has been sentenced to seven years in the case of strict wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.