शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

खराब रस्त्यामुळे दुचाकीवरुन महिला पडली अन‌् मागून आलेल्या ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 20:49 IST

महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ अपघात; एक गंभीर; रस्त्याने घेतला पुन्हा बळी

जळगाव : खराब रस्ता व गतिरोधक यामुळे दुचाकीवर बसलेल्या मीना किशोर तळेले (वय ५३,रा. प्रभात कॉलनी) या खाली पडल्या व त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मीना यांचा जागीच मृत्यू झाला तर पती किशोर हिरामण तळेले गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ घडला. पुन्हा एकदा खराब रस्त्याने महिलेचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हिरामण तळेले व त्यांची पत्नी मीना हे गुरुवारी एमआयडीसीत एका कार्यक्रमासाठी दुचाकीने (क्र.एम.एच १९ डी.सी ६०२५) नातेवाईकांकडे गेले होते. सायंकाळी तेथून घरी परत येत असताना महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ खराब रस्ता व गतिरोधकामुळे मीना यांचा तोल गेला व त्यात दुचाकीवरुन खाली पडल्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकच्या खाली मीना चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला. तर पती किशोर हे गंभीर जखमी झाले असले तरी नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले. अपघात इतका भयंकर होता घटना पाहणाऱ्यांचा अक्षरश: थरकाप उडाला.ट्रक चालकाची माणुसकी शून्य भावनाया अपघातानंतर ट्रक चालकाने थांबून मदत करण्याऐवजी भीपीपोटी पळ काढला. अपघातात मृत्यू झाल्याचा पक्की खात्री झाली असतानाही चालकाने थांबण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान, नागरिकांनी धाव घेण्याआधीच ट्रक तेथून पसार झाला, त्यामुळे तिचा क्रमांकही लिहीता आला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताचा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, कर्मचारी अल्ताफ पठाण, नितीन पाटील, इम्रान शेख, गणेश शिरसाळे, तुषार चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने दाम्पत्याला सरकारी रुग्णालयात हलवून गर्दीमुळे ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मीना तळेले यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे यांनी घटनास्थळ तसेच मृतदेहाचा पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू पाहून पतीचे भान हरपलेया अपघातात पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू, शरीराचा झालेला चेंदामेंदा पाहून पती किशोर तळेले सुन्न झाले. काय झाले व काय करावे हे काही क्षण त्यांना काहीच कळले नाही. रुग्णालयात दाखल करतानाही त्यांचा प्रचंड आक्रोश सुरु होता, घटनास्थळावरील चित्र पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मीन यांच्या पश्चात पती किशोर तळेले, कुंदन आणि चंदन हे दोन मुले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव