बी. एस. चौधरी/ एरंडोल, लोकमत न्यूज नेटवर्कएरंडोल (जि. जळगाव) : एका महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना एरंडोल येथील महादेव मंदिर परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सपना प्रकाश माळी (३३) आणि कन्या केतकी माळी (९) अशी या मृत माय- लेकींची नावे आहेत. घटनास्थळी गादीवर वही आढळून आली आहे. त्यात सपना हिने आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असा उल्लेख केला आहे.
एरंडोल येथे जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात सपना माळी ही माहेरी राहत होती. आठ वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. गुरुवारी दुपारी तिचा भाऊ हा घरी आला त्यावेळी ही घटना उघडकीस आली. याबाबत एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.