पाय घसरून विहिरीत पडल्याने बाहुटे येथे महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:11+5:302021-09-04T04:21:11+5:30
ज्योती प्रकाश पाटील (४०) असे या महिलेचे नाव आहे. त्या पशुवैद्यकीय डॉ. प्रकाश तापीराम पाटील यांच्या पत्नी होत. शुक्रवारी ...

पाय घसरून विहिरीत पडल्याने बाहुटे येथे महिलेचा मृत्यू
ज्योती प्रकाश पाटील (४०) असे या महिलेचे नाव आहे. त्या पशुवैद्यकीय डॉ. प्रकाश तापीराम पाटील यांच्या पत्नी होत. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता जेवण झाल्यानंतर सोबतच्या मजुरांना पाणी आणण्यासाठी त्या विहिरीकडे गेल्या. पाणी काढत असताना गवतावरून त्यांचा पाय घसरला व त्या विहिरीत पडल्या व पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
ज्योती या पाणी घेण्यासाठी गेल्या पण बराचवेळ झाल्याने परतल्या नाहीत. याचा तपास करीत काही मजूर विहिरीकडे पोहचले. त्यावेळी ज्योती या विहिरीत पडल्याचे लक्षात येताच मजुरांनी आरडाओरड केली. हे पाहून शेजारी शेतात काम करणारे व गावातील अनेकांनी विहिरीकडे धाव घेतली. पण ज्योती पाटील यांना विहिरीतून काढण्यास उशीर झाल्याने त्यांना बुडून मृत्यू झाला. त्यांना मृत अवस्थेत बाहेर काढले असता अनेकांनी त्यांचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. पारोळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू व सासरे असा परिवार आहे.