शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:36 IST

डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

जळगाव- प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी जळगावात घडली. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच विवाहितेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पूजा जयप्रकाश विश्वकर्मा असे या मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेसंदर्भात मृत पूजा यांच्या सासूबाई पुष्पा विश्वकर्मा व पती जयप्रकाश विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांना काल (शुक्रवारी) सकाळी शहरातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्या गाजरे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची नॉर्मल प्रसुती झाली. मात्र, यानंतर पूजा यांची प्रकृती खालावली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांना डॉ. गाजरे यांच्या रुग्णालयातून आकाशवाणी चौकातील अपेक्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी हजारो रुपयांची औषधी मागवली. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला नाही. डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी-विश्वकर्मा कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस देखील दाखल झाले होते. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

डॉक्टर गाजरे म्हणतात...पूजा विश्वकर्मा यांची प्रसूती माझ्या रुग्णालयात झाली. प्रसूतीनंतर गर्भाशय नैसर्गिकरित्या आकुंचन पावते. पण पूजा यांच्या बाबतीत तसे झाले नाही. अतिप्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना अपेक्स रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी योग्य तो औषधोपचार केले. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचला नाही. त्यांच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही, असे स्पष्टीकरण डॉ. तिलोत्तमा गाजरे यांनी दिले आहे. विश्वकर्मा कुटुंबीयांनी केलेले आरोप त्यांनी नाकारले आहेत.

 

 

टॅग्स :Jalgaonजळगावdoctorडॉक्टरWomenमहिला