मुक्ताईनगर येथील महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 21:04 IST2020-10-04T21:03:58+5:302020-10-04T21:04:32+5:30
नदीत घेतली उडी

मुक्ताईनगर येथील महिलेची आत्महत्या
मुक्ताईनगर : शहरातील तहसील रोडवरील संताजी नगर मध्ये राहणाऱ्या मीना शरद गोसावी (२२) या महिलेने सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पूर्ण नदीच्या खामखेडा पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात पुरुषोत्तम देविदास पोलाखरे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोला खरे हे नायगाव येथे मोटरसायकलने जात असताना मिनाबाई शरद गोसावी ही महिला पूर्णा नदीच्या पुलावर उभी होती. तिला अडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तिने नदीत उडी घेतली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सादिक पटवे करीत आहे.