युवती पळाल्याच्या रागातून मारहाण

By Admin | Updated: May 20, 2014 01:14 IST2014-05-20T01:14:14+5:302014-05-20T01:14:14+5:30

नंदुरबार : युवती दुसर्‍यासोबत गेल्याचा राग येऊन एकाने विळ्याने वार करून महिलेस जखमी केल्याची घटना वालंबा, ता.अक्कलकुवा येथे घडली.

The woman beat the runaway rage | युवती पळाल्याच्या रागातून मारहाण

युवती पळाल्याच्या रागातून मारहाण

नंदुरबार : युवती दुसर्‍यासोबत गेल्याचा राग येऊन एकाने विळ्याने वार करून महिलेस जखमी केल्याची घटना वालंबा, ता.अक्कलकुवा येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, वालंबा येथील महिलेची मुलगी ही युवकासोबत निघून गेली. त्यामुळे आपली बदनामी झाली. याचा राग येऊन भायजा सारपा वसावे याने महिलेच्या डोक्यावर, दोन्ही हातावर व खांद्यावर विळ्याने वार करून जखमी केले. तिला तातडीने मोलगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत जखमी महिलेच्या फिर्यादीवरून भायजा सारपा वसावे यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विष्णू फुले करीत आहे.

Web Title: The woman beat the runaway rage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.