जळगाव : पतीला काही न सांगता, दोघी विवाहिता रफुचक्कर, वेगवेगळ्या भागातील दोन घटना
By विलास.बारी | Updated: April 6, 2023 16:17 IST2023-04-06T16:17:02+5:302023-04-06T16:17:18+5:30
या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : पतीला काही न सांगता, दोघी विवाहिता रफुचक्कर, वेगवेगळ्या भागातील दोन घटना
जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन विवाहिता पतीला काही न सांगता, घरून रफुचक्कर झाल्याची घटना १ एप्रिल व ३ एप्रिल रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत शहरातील इच्छादेवी चौक परिसरात आपल्या पती सोबत राहणारी ३८ वर्षीय विवाहिता १ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरात काही न सांगता रफुचक्कर झाली. याबाबत पतीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास हवालदार नितीन पाटील हे करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत शहरातील सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील ३० वर्षीय विवाहितादेखील पती किंवा घरातील इतर कोणालाही न सांगता ३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता घरातून गायब झाली. याबाबत तालुका पोलिस स्टेशनमध्ये मीसिंगची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रकाश चिंचोरे करत आहेत. गेल्या महिन्यातदेखील परीक्षेचे नाव करत, एकाच दिवशी तीन तरुणी पसार झाल्याची घटना घडली होती.