परवानगी नसताना मोलगी महाविद्यालयात प्रवेश
By Admin | Updated: October 15, 2015 00:08 IST2015-10-15T00:08:18+5:302015-10-15T00:08:18+5:30
नंदुरबार : विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेशासाठी परवानगी दिली नसताना प्रवेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार मोलगी, ता.अक्कलकुवा येथे प्रज्ञा कला वरिष्ठ महाविद्यालयाने केला आहे.

परवानगी नसताना मोलगी महाविद्यालयात प्रवेश
नंदुरबार : विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेशासाठी परवानगी दिली नसताना विद्याथ्र्याना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार मोलगी, ता.अक्कलकुवा येथे प्रज्ञा कला वरिष्ठ महाविद्यालयाने केला आहे. दरम्यान, विद्याथ्र्याना परीक्षेसाठी परवानगी न मिळाल्याने दोन दिवसांपासून त्यांनी आंदोलन सुरू केले होते. अखेर बुधवारी संस्थाचालकांनी विद्याथ्र्याचे वर्ष वाया जाऊ देणार नाही, असे हमीपत्र दिल्यानंतर विद्याथ्र्यानी आंदोलन स्थगित केले. मोलगी येथे ग्रामविकास मंडळातर्फे प्रज्ञा वरिष्ठ कला महाविद्यालय चालविले जाते. या महाविद्यालयाला 2015-16 साली विद्याथ्र्याना प्रवेशाची परवानगी नसताना महाविद्यालयाने 96 विद्याथ्र्याना प्रथम वर्ष कला महाविद्यालयात प्रवेश दिला. शिवाय वर्गही सुरू केले. मात्र, परीक्षा अर्ज भरताना विद्याथ्र्याना अधिकृत प्रवेश मान्यताच नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने या विद्याथ्र्याचे परीक्षा अर्ज स्वीकारले नाही. त्यामुळे विद्याथ्र्याना या वर्षाची परीक्षाच देता येणार नाही. येत्या 27 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थी व पालकवर्गात संस्थाचालकांप्रति तीव्र असंतोष व्यक्त झाला. या विद्याथ्र्यानी मोलगी येथे शासकीय विश्रामगृह परिसरात संस्थाचालकांच्या विरोधात दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले. अखेर बुधवारी संस्थाचालकांनी विद्याथ्र्याना येत्या सहा दिवसात याबाबत आपण शिक्षणमंत्री, तसेच कुलगुरू यांची भेट घेऊन विद्याथ्र्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विनंती करण्याचे व परीक्षेची हमी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी दुपारी विद्याथ्र्यानी आंदोलन स्थगित केले. मात्र, 20 ऑक्टोबर्पयत याबाबत निकाल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा, तथा संस्थाचालकांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पालक व विद्याथ्र्यानी दिला आहे. संस्थाचालकांच्या अंतर्गत वादामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संस्थेचे जरी बेकायदेशीर काम असले तरी आधी विद्याथ्र्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सर्वानी प्रय} करणे गरजेचे आहे. या विद्याथ्र्याना परीक्षेसाठी यंदा विद्यापीठाने बसू द्यावे अशी विनंती आपण आदिवासी पालकांतर्फे कुलगुरूंना करणार आहोत. -सी.के.पाडवी, माजी सभापती, जि.प. नंदुरबार. संस्थाचालकांनी विद्याथ्र्याना अंधारात ठेवून परवानगी नसताना परवानगी आहे असे भासविले व प्रवेश दिला. त्यामुळे 96 विद्याथ्र्याच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू. -महेश वसावे, विद्यापीठ प्रतिनिधी