शिरसोदे येथील आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:40 IST2019-07-25T17:40:44+5:302019-07-25T17:40:47+5:30

पारोळा : तालुक्यातील शिरसोदे येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाºयाची काही दिवसांपूर्वी बदली झाली. मात्र, हे पद अद्याप रिक्त असून ...

 Without a medical officer at the health center at Shirsode | शिरसोदे येथील आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना

शिरसोदे येथील आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना


पारोळा : तालुक्यातील शिरसोदे येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाºयाची काही दिवसांपूर्वी बदली झाली. मात्र, हे पद अद्याप रिक्त असून वैद्यकीय अधिकाºयाअभावी परिसरातील रुग्णांची फरफट होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.चौधरी यांची नुकतीच बदली झाली. त्यांनी पदभार सोडला, पण त्यांच्या पदावर नव्याने वैद्यकीय अधिकारी अद्याप रुजू झाले नाहीत. यामुळे गेल्या चार त पाच दिवसांपासून आरोग्य केंद्र डॉक्टरांविना आहे. रुग्णांचे उपचारासाठी मात्र हाल होत आहेत. लहान मुलांसह आलेल्या परिसरातील ग्रामस्थांना उपचाराअभावी परत फिरावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Without a medical officer at the health center at Shirsode