हिवाळी परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST2021-04-27T04:17:32+5:302021-04-27T04:17:32+5:30

==================== कोरोना योद्ध्यांचा सत्कार जळगाव : आदर्श हिंदी हायस्कूलतर्फे कोरोना योद्ध्यांचा ऑनलाइन सत्कार करण्‍यात आला. यावेळी पंडित शर्मा, टिळक ...

Winter exam results announced | हिवाळी परीक्षेचा निकाल जाहीर

हिवाळी परीक्षेचा निकाल जाहीर

====================

कोरोना योद्ध्यांचा सत्कार

जळगाव : आदर्श हिंदी हायस्कूलतर्फे कोरोना योद्ध्यांचा ऑनलाइन सत्कार करण्‍यात आला. यावेळी पंडित शर्मा, टिळक शर्मा, राजू शर्मा, गोवर्धन त्रिपाठी, साधुराम कलवाणी, अनिल उदासी यांचा सत्कार झाला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्‍यक्ष राजू आडवाणी, रमेश कटारिया, वासुदेव तलरेजा, वरुण रावलाणी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अरविंद मोतीरामाणी यांनी केले.

==================

आज ऑनलाइन श्रद्धांजली सभा

जळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगाव यांच्यातर्फे प्राचार्य डॉ.किसन पाटील व प्रा.भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे मंगळवारी सकाळी १० वाजता करण्‍यात आले आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.

======================

शांतीनगरातील पथदिवे बंद

जळगाव : जुने हायवे भागातील शांती नगरातील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या भागात रात्रीच्या सुमारास काळोख पसरतो. सध्या चोरीच्या घटना वाढल्या असल्यामुळे बंद पथदिवे सुरू करण्‍याची मागणी रहिवाशांनी केली आहे, तसेच ज्या भागांमध्ये पथदिवे नाहीत, त्या ठिकाणी तत्काळ बसविण्‍यात यावे, अशीही मागणी करण्‍यात आली आहे.

=======================

प्रतीक्षा आरटीई प्रक्रिया सुरू होण्याची

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ३० एप्रिलपर्यंत आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला ब्रेक देण्‍यात आला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे कागदपत्रांची जमवाजमव करण्यात पालकही व्यस्त आहेत. काहींच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून येत असल्यामुळे, ती त्रुटी दूर करण्यासाठी पालक शासकीय कार्यालयांच्या चकरा मारीत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Winter exam results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.