माजी मंत्री खडसेंवरील पुस्तकात असणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:07 PM2020-08-29T23:07:13+5:302020-08-29T23:08:10+5:30

मतीन शेख मुक्ताईनगर , जि.जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरील ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ हे पुस्तक ...

Will there be a book on former minister Khadse? | माजी मंत्री खडसेंवरील पुस्तकात असणार काय?

माजी मंत्री खडसेंवरील पुस्तकात असणार काय?

googlenewsNext
ठळक मुद्दे२ सप्टेंबर रोजी प्रकाशन‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ या दुसऱ्या पुस्तकाची तयारी सुरु

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरील ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ हे पुस्तक येत्या २ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. बेधडक वक्ता असलेले खडसे पक्षांतर्गत आप्तस्वकियांच्या षङ्यंत्राचे बळी ठरले आहेत. अशात खडसे यांच्यावरील पुस्तकात नेमके काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
दरम्यान, खडसेंवर आणखी एक पुस्तक लवकरच येणार असून, नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. हे पुस्तक केव्हा प्रकाशित होईल याचीदेखील प्रतीक्षा लागून आहे.
एकनाथराव खडसे यांच्या बालपणापासून आतापर्यंतचा प्रवास मांडण्यात आलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे लेखन भुसावळचे प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले आहे. अथर्व पब्लिकेशनच्या माध्यमातून २१९ पानांचे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. खडसे यांच्यातले अष्टपैलू गुण, स्वच्छंदी कलाकार, आवडी निवडी, समाजातील मान्यवर पक्षातील नेत्यांच्या, कुटुंबातील सदस्य कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रियांचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे. राजकारणात गॉडफादर याबाबतचे संबोधन यात आहे. नाथाभाऊ यांच्या राजकारणातील प्रवासात अच्छे दिनपासून अलीकडच्या कालखंडातील चक्रव्यूहात अडकलेले नाथाभाऊ या घडामोडीबाबत या पुस्तकात नेमके काय याबाबत लेखकाने अद्याप कोणतेही भाष्य केले नसल्याने पुस्तकाची उत्सुकता आहे.
२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या पुस्तकाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे आपापल्या ठिकाणावरून आॅनलाइन प्रकाशन करणार आहेत. तर खडसे फार्म हाऊस येथे जिल्ह्यातील भाजप नेत्यांसह आमदाराच्या उपस्थित प्रकाशन सोहळा होणार आहे.
याप्रसंगी एकनाथराव खडसे यांच्या जीवनपटवर ९ मिनिटांची डाक्युमेंट्री फिल्मही दाखविली जाणार आहे.


‘या पुस्तकाचे लेखन करण्याचा मला सार्थ अभिमान आहे. एकनाथराव खडसे या पुस्तकापुरते मर्यादित नाही. त्यांचा झंझावात महाराष्ट्राने अनुभवला आहे. हे पुस्तक गौरव पुस्तक होऊ नये म्हणून वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याचा प्रयत्न मी केला आहे. या माध्यमातून युवा व राजकीय लोकप्रतिनिधी ना प्रेरणा मिळावी हा हेतू आहे.
-प्रा.डॉ.सुनील नेवे, पुस्तकाचे लेखक


डॉ.सुनील नेवे यांनी लिहिलेले पुस्तक अद्याप प्रकाशन व्हायचे. त्यामुळे मी पुस्तक अद्याप वाचले नाही. पुस्तक २ सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. वाचल्यानंतर त्यावर बोलता येईल.
-एकनाथराव खडसे, माजी महसूल मंत्री

नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान
दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्यावर आणखी एक पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. पुणे येथील एक लेखक हे पुस्तक लिहीत असून त्याला थोडा अवधी आहे. पुस्तकाचे शीर्षक ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ असे आहे. या पुस्तकातून खडसेंविषयी करण्यात आलेले कटकारस्थान, षड्यंत्र आणि त्याबाबतच्या पुराव्यांचा अंतर्भाव असणार आहे.

Web Title: Will there be a book on former minister Khadse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.