एरंडोल येथे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST2021-06-06T04:13:31+5:302021-06-06T04:13:31+5:30

एरंडोल : वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत चार कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ झाला. यात रस्ते डांबरीकरणासह सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम नव्या गटारीचे ...

Will be at Erandol | एरंडोल येथे होणार

एरंडोल येथे होणार

एरंडोल : वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत चार कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ झाला. यात रस्ते डांबरीकरणासह सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम नव्या गटारीचे बांधकाम कच्च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, आदी विकासकामे करण्यात येणार आहेत.

स्वामी समर्थ केंद्रात

मुक्ताईचंडी पूजा

मुक्ताईनगर : स्वामी सेवा मार्ग दिंडोरी यांच्या वतीने ऑनलाईन मुक्ताईचंडी सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन सेवेत सेवेकऱ्यांनी सहभागी होऊन कोरोना महामारीचे उच्चाटन व्हावे म्हणून आई मुक्ताई चरणी साकडे घातले.

कठोरावासीयांच्या

पत्राकडे झाले दुर्लक्ष

चोपडा : जलवाहिनी खोदण्याच्या कारणावरून कठोरा ग्रामस्थांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे आपल्या मागण्या सादर केल्या होत्या. पण, त्या पत्रांवर कोणताही निर्णय न झाल्याने शुक्रवारी ग्रामस्थांनी ही जलवाहिनी खोदण्यास विरोध केला.

Web Title: Will be at Erandol