पत्नीच्या मृत्यूचा विरह पतीची आत्महत्या

By Admin | Updated: November 19, 2015 00:46 IST2015-11-19T00:46:03+5:302015-11-19T00:46:03+5:30

नंदुरबार : पत्नीच्या मृत्युच्या विरहामुळे शोकग्रस्त झालेल्या पतीने 12 दिवसानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली.

Wife's Ex-Husband's Suicide | पत्नीच्या मृत्यूचा विरह पतीची आत्महत्या

पत्नीच्या मृत्यूचा विरह पतीची आत्महत्या

नंदुरबार : पत्नीच्या मृत्युच्या विरहामुळे शोकग्रस्त झालेल्या पतीने 12 दिवसानंतर आत्महत्या केल्याची घटना दसवड, ता. तळोदा येथे घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस सूत्रांनुसार, दसवड येथे मजुरी करणारा सुकदेव मानसिंग मोरे (वय 23) याच्या प}ीची गेल्या पंधरवडय़ात प्रसूती झाली. यानंतर ती आजारी पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्याला दु:खाने घेरले होते. घटनेला 12 दिवस उलटले होते. प}ीच्या मृत्युमुळे व्यथित झालेल्या सुकदेव मोरे याने आपल्या राहत्या घरी स्वयंपाकघरात लोखंडी पाईपला दोरी बांधून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली.

याबाबतची माहिती विनोद मानसिंग मोरे यांनी दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार हेमंत खाडे तपास करीत आहेत.

 

15 दिवसांचे बाळ

पत्नीचे उत्तरकार्य 16 नोव्हेंबरला होते. उत्तरकार्याचा विधी आटोपल्यानंतर दुस:या दिवशी 17 रोजी पहाटे साडेपाचला त्याने आपली जीवनयात्रा संपविली.

त्याच्या पश्चात 15 दिवसांचे बाळ तसेच आई आहे. सध्या या बाळाचा सांभाळ मयत सुकदेवची आई करीत आहे.

Web Title: Wife's Ex-Husband's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.