विधवेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:34 IST2019-06-07T16:34:23+5:302019-06-07T16:34:57+5:30

दोघा भावांविरूद्ध गुन्हा

Widow rape | विधवेवर बलात्कार

विधवेवर बलात्कार

अमळनेर : शहरातील पारोळा नाका भागात राहणाऱ्या एक ४० वर्षीय महिलेवर चार वर्षांपासून बलात्कार करणाºया धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बळसाने येथील दोघा भावांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा नाका अमळनेर येथील एक ४० वर्षीय महिला धरणगाव येथे राहत असताना विशाल भीमराव साळुंखे व धनराज भीमराव साळुंखे (दोन्ही रा.बळसाने ता.साक्री) यांनीे ती विधवा असल्याचा फायदा घेतला. ती एकटी असताना जवळीक साधून तिला धाक दाखवून शारीरिक संबंध ठेवले. ती अमळनेर येथे राहायला अली असताना ३ रोजी रात्री साडे बारा वाजता दोघांनी दाराला लाथ मारून बलात्कार केला. तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ व धमकी दिली. याप्रकरणी दोघे भावांवर भादवी ३७६ ड , २९४ , ३२३, ५०४ , ५०६ , ५०७, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Widow rape