जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या १० किमीच्या साईडपट्ट्यांचे रूंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:01 PM2018-10-19T22:01:08+5:302018-10-19T22:02:35+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १५ कोटीची निविदा तयार

widning of 10 km of National Highways in Jalgaon city | जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या १० किमीच्या साईडपट्ट्यांचे रूंदीकरण

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या १० किमीच्या साईडपट्ट्यांचे रूंदीकरण

Next
ठळक मुद्दे निविदा मंजुरीसाठी शासनाकडे रवाना

जळगाव: शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा डीपीआर मंजुरीचा घोळ सुरूच असल्याने ती मंज़ुरी होऊन काम सुरू होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच शहरातील महामार्गाच्या साईडपट्ट्यांचे रूंदीकरण व दुरूस्तीचे काम करण्याच्या पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ कोटी रूपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून निविदाही तयार केली असून ती मंज़ुरीसाठी शासनाकडे पाठविली आहे.
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचे काम डीपीआरच्या घोळात अडकले आहे. आता चौथ्यांदा डीपीआर मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे समांतर रस्त्यांअभावी नागरिकांना मात्र या महामार्गावरूनच ये-जा करावी लागत असल्याने अपघातांचे सत्रही सुरूच असून निरपराध लोकांना बळी जात आहे. त्यामुळे १ आॅक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार भोळे यांनी महामार्गाच्या साईडपट्ट्यांची दुरूस्ती अर्धवट राहिल्याने अपघात होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर पालकमंत्र्यांनी ‘नही’कडून महामार्गाच्या तसेच समांतर रस्त्यांच्या कामास वेळ लागेल. तोपर्यंत हा महामार्ग ‘नही’च्या ताब्यात असला तरीही लोकांच्या हितासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साईडपट्ट्यांची दुरूस्ती केली जाईल. त्यासाठी देखभाल दुरुस्तीच्या निधीतून खर्च करता येईल, असे सांगून अधीक्षक अभियंता सोनवणे यांना डिपार्टमेंटल डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गोदावरी कॉलेज ते गिरणा पूलापर्यंत दुरूस्ती
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते गिरणा नदी पुलापर्यंत सुमारे १० किमीच्या अंतरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांचे रूंदीकरण व दुरुस्ती करण्याचे तसेच महामार्गावर झेब्राक्रॉसिंगतचे तसेच गतीरोधकांवर पांढरे पट्टे आखण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे.

Web Title: widning of 10 km of National Highways in Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.