शिंदे साहेब मुंबईला का यायचे..?(कुजबूज)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:17+5:302021-07-22T04:12:17+5:30

(अजय पाटील) शहरातील समस्या बिकट आहेत. रस्त्यावरून वाहने घसरत आहेत, धुळ, धूर व चिखलाने जळगावकर त्रस्त आहेत. ...

Why did Shinde Saheb come to Mumbai ..? (Whisper) | शिंदे साहेब मुंबईला का यायचे..?(कुजबूज)

शिंदे साहेब मुंबईला का यायचे..?(कुजबूज)

(अजय पाटील)

शहरातील समस्या बिकट आहेत. रस्त्यावरून वाहने घसरत आहेत, धुळ, धूर व चिखलाने जळगावकर त्रस्त आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली म्हणून सेनेचे मुख्यमंत्री मनपाकडे लक्ष देतील असेच वाटत होते. मात्र, सेनेच्या मंत्र्यांनी व नगरसेवकांनीही आपापली प्रसिध्दी करून, सत्तेचा आनंद साजरा करून घेतला आणि जळगावकरांना पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले. सत्ता आल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शहरात येत असल्याने शहरातील रस्त्यांचा कामांसाठी चांगला निधी देतील अशी अपेक्षा होती. मात्र, शिंदे साहेब पहिलेच मनपात सात................................ उशिराने आले. त्यात मुंबईला या म्हणून सांगून गेले. मात्र, मुंबईला का यावे याबाबत काहीच सांगितले नाही. त्यामुळे जळगावकरांचा भ्रमनिरास तर करून गेलेच मात्र नगरसेवकांनांही ‘कन्फ्यूज’ करून गेले. आता आमचे नगरसेवक आठवडाभरापासून एकच विचार करत आहेत. मुंबईला का जायचे, की पुन्हा मार्च महिन्यातली बाकी होती ती तर नाही मिळणार, असाच विचार नगरसेवक करत आहेत.

Web Title: Why did Shinde Saheb come to Mumbai ..? (Whisper)