कुजबूज मॅटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:57+5:302021-09-03T04:17:57+5:30
चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला होता. अनेक ...

कुजबूज मॅटर
चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला होता. अनेक घरांची पडझड झाली तर शेकडो जनावारांचा मृत्यू झाला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. कन्नड घाटातही दरड कोसळली अन् संपूर्ण महामार्ग बंद झाला. या संपूर्ण घटनांचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झालक आणि चर्चेला उधाण आले. असाच एक अनुभव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. शिपाई बांधवांमध्ये चर्चा रंगली होती. जो तो एकमेकांना व्हॉट्सॲपवर आलेले व्हिडिओ दाखवित होते. एकाने अचानक ‘भाऊ, तो व्हिडिओ पाहिला का?’... ‘कुठला रे बाबा?’ असं उत्तर इतरांकडून मिळताच, कपाशीची पिकं नष्ट झाली असल्याचा व्हीिडिओ त्या एकाने दाखविला. नंतर आणखी चर्चा रंगली व जो तो जीवनात आलेले अनुभव व पिकांची कशी निगा राखावी त्यावर सल्ले देऊ लागला. काही वेळात साहेबांची बेल वाजली आणि तिथेच चर्चा थांबली.
-सागर दुबे