(कुजबूज) सत्ताधाऱ्यांना आता पडला कचऱ्याचा विसर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:47+5:302021-07-27T04:17:47+5:30
जळगाव महापालिकेची स्थायी सभा असो किंवा महासभा..प्रत्येक सभेत शहरातील अस्वच्छतेबाबत नगरसेवकांची ओरड ही नित्याचीच झाली आहे. गेले अडीच वर्ष ...

(कुजबूज) सत्ताधाऱ्यांना आता पडला कचऱ्याचा विसर..
जळगाव महापालिकेची स्थायी सभा असो किंवा महासभा..प्रत्येक सभेत शहरातील अस्वच्छतेबाबत नगरसेवकांची ओरड ही नित्याचीच झाली आहे. गेले अडीच वर्ष मनपात भाजपाची सत्ता असताना, विरोधक असलेल्या आणि आता सत्तेत आलेल्या शिवसेेनेवर भाजपाला शहरातील अनियमित साफसफाई वरून अनेकदा धारेवर धरले. तासनतास महासभेत शहरातील कचऱ्याच्या समस्येवरून सभांमध्ये वादळी चर्चा व्हायची.
मात्र, आता हेच विरोधक सत्तेत आल्यानंतर त्यांना शहरातील कचऱ्याचा विसर पडला आहे की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषत : नवी पेठेत गल्ली-बोळात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचले आहे. ऐन पावसाळ्यात यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनियमित साफसफाईमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना, सत्ताधारी नगरसेवक यावर गप्प का आहेत, त्यांचेही प्रशासनावर नियंत्रण राहिले नाही का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या जळगावकरांमधुन उपस्थित करण्यात येत आहेत. फुले मार्केट समोर एका नागरिकाने तर चहाच्या टपरीवर चहा पीत असलेल्या नगरसेवकाला कचऱ्याच्या प्रश्नावरून थेट, सत्तेत आल्यानंतर आता कचऱ्याचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला होता.
सचिन देव