कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:29+5:302021-08-26T04:20:29+5:30
कुजबुज - सागर दुबे हेच महाविद्यालय मिळावं म्हणून धडपडीत अर्ज भरला... आपला क्रमांक लागून जाईल ही अपेक्षा होती... पण ...

कुजबुज
कुजबुज - सागर दुबे
हेच महाविद्यालय मिळावं म्हणून धडपडीत अर्ज भरला... आपला क्रमांक लागून जाईल ही अपेक्षा होती... पण भाऊ, आता काही खरं नाही रे भो. विज्ञान शाखेसाठी जागांपेक्षा दुपटीने अर्ज दाखल झाली रं बाबा... गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावरच समजेल काय होणार? अशी कुजबुज बुधवारी एका नामांकित महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये सुरू होती. सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांकडून २० ते २४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यंदा विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती दाखविली आहे. त्यामुळे जागांपेक्षा दुपटीने अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आले आहे. जर विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला नाही, तर वाणिज्य शाखेला प्रवेशासाठी प्रयत्न करणार असल्याचीही चर्चा त्या तरुणांमध्ये सुरू होती. यंदा परीक्षा आणि प्रवेशाचा नुसता गोंधळच-गोंधळ सुरू असून, परीक्षा झाल्या असत्या तर बरं झालं असतं, असं विद्यार्थ्यांच्या चर्चेतून ऐकायला मिळालं.