कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:33+5:302021-06-26T04:12:33+5:30
ब्रेक के बाद ! आरटीईची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली हे मात्र तितकेचं खरे असले तरी अद्याप हजारावर ...

कुजबूज
ब्रेक के बाद ! आरटीईची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली हे मात्र तितकेचं खरे असले तरी अद्याप हजारावर विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला नाही. लवकरच निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची मुदत संपणार आहे. त्यामुळे मुदत न वाढविता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी, अशी चर्चा आता पालकांमधून होत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रतीक्षा यादीमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती़ मात्र या दुरुस्तीनंतर अनेक क्रमांक खाली-वर झाल्यामुळे अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता ३० जूनपर्यंत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अंतिम मुदत ही काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, तरीही हजारावर विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यामुळे मुदतीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी व चर्चा पालकांकडून होऊ लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत असते. दरवर्षी हजारावर जागा रिक्त राहतात. त्यामुळे दरवर्षीची परंपरा कायम राहू नये, यासाठी सर्वांना संधी मिळावी, यासाठी उपाययोजना करण्याचीही पालकांमधून चर्चा ऐकायला मिळाली.