कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:16+5:302020-12-04T04:43:16+5:30
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरू करण्याची परवानगी अखेर मिळाली. पाच डिसेंबरपासून हा जलतरण तलाव सुरू होत आहे. त्यावरून ...

कुजबूज
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरू करण्याची
परवानगी अखेर मिळाली. पाच डिसेंबरपासून हा जलतरण तलाव सुरू होत आहे.
त्यावरून तलावाचा ठेकेदार आणि क्रीडा कार्यालय यांच्यात वाद निर्माण
होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता हा तलाव सुरू झाला.
त्यामागचे कारण नेमके काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तशी चर्चाही
बुधवारी क्रीडा वर्तुळात चांगली रंगली होती.