शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केव्हा कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 13:40 IST

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या चार महिन्यात असा एकही दिवस नाही की जळगाव ते नशिराबाद दरम्यान महामार्गावर अपघात झाला नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन हलायला तयार नाही. नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत हे दोन्ही घटक पाहत आहेत.जळगाव जिल्ह्यातील चिखली (ता.मुक्ताईनगर) पासून तर धुळे ...

विकास पाटीलराष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या चार महिन्यात असा एकही दिवस नाही की जळगाव ते नशिराबाद दरम्यान महामार्गावर अपघात झाला नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन हलायला तयार नाही. नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत हे दोन्ही घटक पाहत आहेत.जळगाव जिल्ह्यातील चिखली (ता.मुक्ताईनगर) पासून तर धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंतच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामगेल्याकाहीवर्षांपासूनहाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. ते केव्हा पूर्ण होईल, हे प्रशासनही सांगू शकत नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्यात आल्याने हा महामार्ग धोकादायक बनला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे.पाळधी ते नशिराबादपर्यंतचा महामार्ग तरअत्यंत धोकादायक बनला आहे. प्रचंड वर्दळ, त्यातच महामार्गाची व साईडपट्ट्यांची झालेली दैना अपघातास कारणीभूत ठरत आहे. चौपदरीकरण होईल तेव्हा होईल मात्र साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्यास काय अडचण आहे?दररोज होत असलेल्या अपघातात कुणाचा मुलगा ठार होत आहे तर कुणाचा पिता. घरातील कर्त्या पुरुषाचाच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाला याचे सोयरेसुतक नाही. ज्या कुटुंबाचे पोट त्या कर्ता पुरुषावर अवलंबून असते, तो अचानक गेल्याने त्या कुटुंबाची अवस्था काय असते, हे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कदाचित माहित नसावे. म्हणून कदाचित महामार्गाचे चौपरीकरण व जळगावातील समांतर रस्त्यांचे काम तातडीने व्हावे यासाठी हे दोन्हीही घटक प्रयत्न करताना दिसत नाही. ते केले असते तर आतापर्यंत बरेच काम झाले असते व अनेकांचा जीव वाचला असता. मात्र लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देवून वेळ मारुन नेत आहेत.जळगावजिल्ह्यातरस्ते सुरक्षा समितीची बैठक नियमितहोत नाही. कधी तरी होते, तिही कुणी गांभीर्याने घेत नाही. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झालेलीनाही. त्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. काल पाळधीगावानजीक वळण रस्त्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी घेवून जाण्यासाठी शाळेकडे जात असलेल्या एका व्हॅनला दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात तीन जण ठार झाले. गेल्या महिन्यात नशिराबाद नजिकही वळणावर भीषण अपघात झाला होता. त्यात जळगावातील पाच तरुण ठार झाले होते. त्यानंतर त्याच जागी पुन्हा दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. त्यात दोन चालक ठार झाले. वळणांवर वारंवार अपघात होत असताना तेथे साधे ‘रिफ्लेक्टर’ही लावण्याची तसदी प्रशासनघेतनाही.यावरुनवाहनधारकांच्या जीवाची त्यांना किती काळजी आहे, हे यावरुन दिसून येते.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव