विसजर्न मार्गाची दुरुस्ती केव्हा?
By Admin | Updated: September 23, 2015 00:11 IST2015-09-23T00:11:15+5:302015-09-23T00:11:15+5:30
जळगाव : बाप्पाच्या विसजर्नाला अवघे चार दिवस शिल्लक असतानाही विसजर्न मार्गाची दैना कायम असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

विसजर्न मार्गाची दुरुस्ती केव्हा?
जळगाव : बाप्पाच्या विसजर्नाला अवघे चार दिवस शिल्लक असतानाही विसजर्न मार्गाची दैना कायम असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. विसजर्न मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांनी जाहीर केले होते मात्र अद्यापही हा मार्ग दुरुस्त करण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर विसजर्न मार्गावर ठिकठिकाणी कच:याचेही ढिग साचले आहेत. येत्या तीन दिवसात हा मार्ग महापालिकेकडून दुरुस्त होणे व स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. खड्डे व कच:याचे ढिग कायम विसजर्न मार्गाची पाहणी केली असता, रस्त्यात विविध ठिकाणी 27 मोठे खड्डे पडलेले असल्याचे दिसून आल़े तर बालाजी मंदिर आणि रजा चौकात कच:याचे ढिग साचले आहेत. बाप्पाची विसजर्न मिरवणूक 27 रोजी मोठय़ा जल्लोषात काढली जाणार आहे. या मिरवणुकीत ट्रॅक्टर, ट्रक आदी चारचाकी वाहनांचा वापर गणेशभक्तांकडून केला जातो़ रस्ता खराब असल्याने वाहन व्यवस्थितपणे विसजर्न स्थळार्पयत पोहाचू शकत नाहीत़ वाहने पंर होण्याची भीती आहे. तसेच अपघातही होऊ शकतो. त्यामुळे या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पांडे डेअरी चौक ते कंजरवाडय़ार्पयत रस्त्याची दुरुस्ती पांडे डेअरी चौक ते कंजरवाडय़ा र्पयत रस्त्याची मनपाकडून दुरुस्ती करण्यात आलेली आह़े मात्र कंजरवाडा ते सिंधी कॉलर्नीपतचा रस्ता अद्यापही खराब आह़े कंजरवाडा ते सिंधी कॉलनी दरम्यान 3 मोठे खड्डे आहेत़ तर डी मार्ट ते विनोबा नगर दरम्यान 11 खड्डे आहेत़ विसजर्न मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी गणेशभक्तांकडून मागणी होत आह़े असे आहेत खड्डे रजा चौक 3 बालाजी मंदिर परिसर 1 दक्षिण मुखी हनुमान मंदिर 1 जिल्हा सामान्य रूग्णालय 2 कंजरवाडा 2 मागासवर्गीय विद्याथ्र्याचे 1 वसतीगृह श्यामा फायर 5 डी मार्ट समोर 4 जीवन ज्योती बस स्थानक 3