जेव्हा विरोधी पक्षनेते पाया पडतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:54 IST2017-08-14T00:50:25+5:302017-08-14T00:54:37+5:30
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरूपसिंग नाईक यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला.

जेव्हा विरोधी पक्षनेते पाया पडतात...
जेव्हा विरोधी पक्षनेते पाया पडतात...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची आपली परंपरा आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी नंदुरबारात आले होते. सकाळी शासकीय विश्रामगृहात प्रवेश करताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुरूपसिंग नाईक यांच्याशी त्यांची भेट झाली. विखेपाटील यांनी त्यांना पाहताच पहिले त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्या वागण्यातून आपली संस्कृती व परंपरा जोपासण्याचा आदर्श या वरिष्ठ मंडळींच्या वागण्यातून पाहावयास मिळाला़ या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत हेही उपस्थित होते़.