मी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिले, त्यावेळी अनेकांची झोप उडाली - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:54 PM2019-03-16T16:54:25+5:302019-03-16T16:56:12+5:30

निवडणुकीच्या तोंडावर भुसावळ येथे वक्तव्य

When I saw the dream of Chief Minister, many people fell asleep - Eknathrao Khadse | मी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिले, त्यावेळी अनेकांची झोप उडाली - एकनाथराव खडसे

मी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिले, त्यावेळी अनेकांची झोप उडाली - एकनाथराव खडसे

Next
ठळक मुद्देपुस्तक लिहिले पाहिजे आणि राजकीय जीवनातील प्रसंग टिपले पाहिजेविद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणास हजेरी

भुसावळ, जि. जळगाव - निबंध स्पर्धेमध्ये एका विद्यार्थ्याने निबंधात लिहिले आहे की, ‘स्वप्न असे पहावे, की दुसऱ्याची झोप उडावी, मीही मुख्यमंत्री पदाचे असेच स्वप्न पाहिले, त्यावेळी अनेकांची झोप उडाली’, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून खडसे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, कुलगुरू पी.पी.पाटील, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे ताप्ती, एज्युकेशन सोसण्याचे चेअरमन मोहन फालक, सचिव विष्णू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, प्राचार्या मीनाक्षी वायकोळे, संजय नाहाटा, महेश पालक, देवा वाणी, मुन्ना तेली आदी उपस्थित होते.
यावेळी खडसे म्हणाले की, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील साहित्याच्या स्वरूपात सुप्त कला असल्याचे दिसून आले. पुस्तक लिहिले पाहिजे आणि राजकीय जीवनातील प्रसंग टिपले पाहिजे, असे मलाही वाटते. मात्र ते जमले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली, तर एका विद्यार्थ्याने रक्षा खडसे यांच्यावरही निबंध लिहिला आहे. खरे तर हा निबंध या स्पर्धेसाठी दिला नव्हता, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आजूबाजूला काय आहे, या घटनेसंदर्भातही विद्यार्थ्यांनी लिखाण केल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. लिखाणाचा विषय आपण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दिला. मात्र विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे, असे त्यांनी नमूद केले, तर या स्पर्धेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.
या स्पर्धेत जळगाव, बुलढाणा, धुळे , नंदुरबार या जिल्ह्यातील महाविद्यालयातील तब्बल सात हजार ८९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रसंगी खासदार रक्षा खडसे, कुलगुरू पाटील, आमदार सावकारे आदींनी मनोगत व्यक्त केले, तर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वालन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. नेवे यांनी केले. विद्यार्थ्यांसह संस्थेचे मोहन फालक यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: When I saw the dream of Chief Minister, many people fell asleep - Eknathrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.