जळगाव जिल्ह्यातून हद्दपार आरोपी शहरात वावरत असताना पोलिसांच्या जाळ्य़ात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:12 IST2018-01-13T12:10:11+5:302018-01-13T12:12:26+5:30
विनयभंगाचा दाखल होता गुन्हा

जळगाव जिल्ह्यातून हद्दपार आरोपी शहरात वावरत असताना पोलिसांच्या जाळ्य़ात
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13- दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या किरण शंकर ठाकरे (वय 26, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. दरम्यान, हद्दपार असताना किरण याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यातही तो फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण ठाकरे हा सराईत गुन्हेगार असल्याने प्रशासनाने त्याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. असे असतानाही तो शहरात वावरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, सचिन मुंडे व गर्जे यांनी सुप्रीम कॉलनीत त्याला हेरुन ताब्यात घेतले. दरम्यान, ठाकरे याला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर मनपाचा एक पदाधिकारी त्याच्या मदतीसाठी रात्री पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.