शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाळूच्या अवैध वाहतुकीच्या डम्परच्या चाकांची हवा काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 11:25 PM

चोपडा तालुका : रस्ता तयार करण्याच्या मध्यस्थीनंतर मिटला वाद

ठळक मुद्देवाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न दरम्यान, चाळीसगाव येथे वाळू माफियांकडून नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.वाळूने भरलेला ट्रॅक्टर नायब तहसीलदार सोनवणे यांनी पहाटे साडेतीनला धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोल पंपाजवळ अडविला. त्यावेळी ट्रॅक्टरचालक तेथून पळून गेला. भैय्या जोशी व बंटी राजपूत या दोघांनी विशाल सोनवणे यांच्याशी हुज्जत घालून त्यांना खाली ढकलून दिले व जिवे माघटनेनंतर दोघे जण तेथून पसार झाले. चाळीसगाव शहर पोलिसात ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक, भैय्या जोशी व बंटी राजपूत या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि राजेंद्र रसेडे करीत आहे.

आॅनलाईन लोकमतचोपडा, जि.जळगाव, दि. ४ : तालुक्यातील सनपुले येथून जवळच असलेल्या तापी नदी किनाऱ्यावरून वाळूची अवैध वाहतूक करणाºया एका कंत्राटदाराच्या दोन डंपरच्या चाकांची हवा संतप्त ग्रामस्थांनी काढली.तायुनानी तापी नदी पात्रातच डम्परच्या चाकातील हवा काढल्याने वाहनचालकाची मोठी पंचायत झाली होती. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे सनपुले येथील रस्ता खराब होत असल्याने गावातील १५ ते २० तरुण एकत्र आले व संबंधित दोन डंपर पकडले आणि संबंधित तलाठ्यास घटनास्थळी बोलाऊन पंचनामा करून दोन्ही डंपर तहसील कार्यालयावर नेण्यात आले. संबंधित कंत्राटदार व चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे ठरले. मात्र गावाचा रस्ता करण्याच्या तडजोडीने गुन्हा दाखल करण्यात आपसात तडजोड करण्यात आलीे.अधिक माहितीसाठी तहसीलदार दीपक गिरासे, निवासींनायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधला असता दोघांनी प्रतिसाद दिला नाही.वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून सनपुले या गावाचा ठेका नसताना सर्रास अवैध वाहतूक सुरू होती.तरुणांनी डंपर पकडल्यावर दंडात्मक किंवा गुन्हे दाखल करणे गरजेचे असताना तडजोड करणे कितपत योग्य आहेश हा चिंतनाचा विषय आहे. विशेष म्हणजे तरुणांनी हा डंपर पकडल्यावर हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. 

टॅग्स :sandवाळूChalisgaonचाळीसगाव