शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

जळगावच्या बाजारपेठेत मागणी वाढल्याने गव्हाचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:54 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव :  जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे ...

विजयकुमार सैतवाल

जळगावजळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या आठवड्यात गव्हाची आवक कमी झाल्याने व मागणी कायम असल्याने गव्हाच्या भावात १५० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे. सोबतच डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यापाठोपाठ या आठवड्यातही गव्हासह डाळीमध्येही वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. तांदळालादेखील मागणी कायम असल्याने त्यांचेही भाव वाढले आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून कडधान्याची आवक कमी असल्याने उडीद-मुगाच्या डाळीवर परिणाम झाला आहे. हा फटका अद्यापही कायम असून या सोबतच आता कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध येऊन डाळींचे भाव वाढण्यासह गव्हाच्या आयात शुल्कात वाढ झाल्याने त्यांचे भाव वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ७८०० ते ८३०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीचेही भाव ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५७०० ते ६१०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. तसेच तूरडाळीचेदेखील भाव ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवरुन ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.गव्हातही तेजीवर्षभरासाठी धान्य खरेदी अद्यापही कायम असून ती १५ जूनपर्यंत अशीच राहणार असल्याने गव्हाला मागणी वाढून दोन आठवड्यापासून गव्हाचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर गव्हाची आवक कमी झाल्याने भाववाढीस मदत होत आहे. २२०० ते २३५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २२५० ते २३०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू असून तिचे प्रमाण कमी झाले आहे.तांदुळाचेही भाव वाढलेतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या तांदळाच्या भावातही दोन आठवड्यांपासून वाढ होत आहे. यात चिनोर ३३०० ते ३७०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४३०० ते ४६०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४९०० ते ५२०० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती तांदुळाचे भाव ९१०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचेले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव