शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अशा चोरांना म्हणावं तरी काय... चैनीसाठी करायचा महागड्या सायकलींची चोरी!

By सागर दुबे | Updated: April 26, 2023 20:29 IST

सायकल चोर फसला पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल ३१ सायकली हस्तगत

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरातील क्लासेस, अभ्यासिकांच्या बाहेरून महागड्या सायकली चोरणाऱ्या चोरट्याला रामानंदनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल ३१ सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जयेश अशोक राजपूत (१९, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) असे चोरट्याचे नाव आहे. केवळ चैनीसाठी या चोऱ्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संताजी नगर येथील गिरिष खैरकर या विद्यार्थ्यांची शिवकॉलनीतील एकलव्य स्टडी पॉईंटच्या बाहेरून सायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुशिल चौधरी हे करीत असताना त्यांना पिंप्राळा येथील जयेश राजपूत हा चोरीच्या सायकली कमी किंमतीमध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसांचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पिंप्राळा येथून राजपूत याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देवून पोलिसांनी तब्बल ३१ सायकली काढून दिल्या.

अभ्यासिका, क्लासेसटार्गेट

सायकल चोरटा जयेश हा शिवकॉलनी, गणपतीनगर, आदर्श नगर, रामानंदनगर परिसरातील अभ्यासिका आणि क्लासेस बाहेर उभ्यास असलेले आणि कंपाउंडमध्ये लावलेल्या सायकली चोरत होता. त्या चोरल्यानंतर त्यांची ५०० ते हजार रूपये किंमतीमध्ये विक्री करीत होत्या. ज्यांना सायकली विक्री केल्या त्यांच्याकडून सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

मौजमजेसाठीसायकलींचीचोरी

केवळ मौजमजेसाठी सायकलींची चोरी करीत असल्याची कबुली जयेश याने पोलिसांना दिली आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांची चौकशी सुरू आहे.

यांनीकेलीकारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित व पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सपकाळे, विजय खैरे, सुशिल चौधरी, रेवानंद साळूंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव