..अन्य संशयितांचे काय ?

By Admin | Updated: December 4, 2014 14:58 IST2014-12-04T14:58:48+5:302014-12-04T14:58:48+5:30

जिल्हा दूध सहकारी संघातर्फे विक्री करण्यात येणार्‍या दुधातील भेसळ प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ विक्रम आहाळे यांना आरोपी केले आहे.

What about other suspects? | ..अन्य संशयितांचे काय ?

..अन्य संशयितांचे काय ?

>जळगाव : जिल्हा दूध सहकारी संघातर्फे विक्री करण्यात येणार्‍या दुधातील भेसळ प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ विक्रम आहाळे यांना आरोपी केले आहे. आहाळे यांना यात मदत करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्या संशयितांवर काय कारवाई करणार?.. या आशयाचे पत्र शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहे.
अन्न विश्लेषकांच्या मते दूध असुरक्षित
जिल्हा दूध संघातून मुंबई येथील पथकाने १८ नोव्हेंबर रोजी टोण्ड व म्हशीच्या दुधाचे नमुने घेतले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या दुधामध्ये मिल्क फॅट कमी, स्किम मिल्क पावडर आणि साखर आढळून आल्याने अन्न सुरक्षा मानके कायदा २00६ चे तरतुदीनुसार खाण्यास व पिण्यास असुरक्षित असल्याचे मत अन्न वेिषकांनी नोंदविले आहे.
एकटे आहाळे दोषी कसे?..
जिल्हा दूध संघात शेतकर्‍याकडून दूध घेतल्यानंतर ते दूध संघात येत असते. त्यानंतर गुणवत्ता व नियंत्रण विकास अधिकार्‍यांनी मान्यता दिल्यानंतर त्याची पॅकिंग केली जात असते. त्यानंतर पुन्हा हे दूध गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडे तपासणीसाठी पाठविले जाते. त्यानंतर ते बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असते. या प्रक्रियेत वरिष्ठांचा सहभाग असल्याशिवाय एकटे आहाळे हे दुधातील भेसळीचा निर्णय घेणे शक्य नसल्याच्या निष्कर्षापर्यंत तपासाधिकारी किसनराव नजन पाटील हे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात एकटे आहाळे हे आरोपी कसे, असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी अन्न व औषध विभागाकडे स्पष्टीकरण मागविले आहे.
 
आवक व जावक सारखी, तर लोणी आले कोठून?
पोलिसांनी जिल्हा दूध संघात शेतकर्‍यांकडून आलेल्या दुधाच्या १८ नोव्हेंबरच्या नोंदीचे रेकॉर्ड तपासले आहे. त्यात २८ हजार लीटर गायीचे, तर १५ हजार लीटर म्हशीचे दूध शेतकर्‍यांकडून घेण्यात आले आहे. या दुधावर प्रक्रिया केल्यानंतर तितकेच दूध विक्रीसाठी बाहेर पडलेले आहे. जेवढे दूध आले तितकेच दूध विक्रीला पाठविले आहे तर मग त्या दिवशी तयार केलेले लोणी कोणत्या दुधाद्वारे बनविले? अशी विचारणा पोलिसांनी केली आहे. मुंबईच्या पथकाने ज्या दुधाचे नमुने घेतले होते, ते दूध विक्रीच्या शेवटच्या टप्प्याला असल्याने त्याची जळगाव, धुळे व नाशिक या भागात विक्री झालेली आहे. 
 
परवाना कशाचा?
जिल्हा दूध संघाने शेतकर्‍यांकडून आलेल्या दुधावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीचा परवाना घेतला आहे की, दुग्धजन्य पदार्थ तयार करून विक्री करण्याचा परवाना घेतला आहे? अशी विचारणा करणारे पत्र पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहे. जिल्हा दूध संघातर्फे सध्या लोणी, श्रीखंड, तूप तयार करून त्याची विक्री सुरू केली आहे.
 
दूध भेसळीच्या दोन पर्यायांचा निष्कर्ष
मुंबईच्या पथकाने पाठविलेल्या अहवालात जिल्हा दूध संघातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये फॅट कमी आहे, साखर आहे, तसेच दुधाची पावडर टाकण्यात आली आहे असे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहे. त्या आधारावर पोलिसांनी भेसळच्या दोन शक्यता वर्तविल्या आहेत. त्यात शेतकर्‍यांकडून आलेल्या दुधावर प्रक्रिया करून त्यातील लोणी काढले जात असावे. दुधातील लोणी काढल्यामुळे दुधातील फॅट कमी होत असावे अशी शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी की, शेतकर्‍यांकडून दूध आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून त्यात पाणी मिसळले जात असावे. दुधाची फॅट वाढविण्यासाठी त्यात साखर व दुधाची पावडर मिसळण्यात येत असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 
 

Web Title: What about other suspects?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.