धरणगावला विद्यार्थ्यांचे घरी जाऊन स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:09+5:302021-06-16T04:23:09+5:30
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी घरी राहून ऑनलाईन अभ्यास करत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात आपल्याला शाळेत जायला मिळेल या अपेक्षेने विद्यार्थी ...

धरणगावला विद्यार्थ्यांचे घरी जाऊन स्वागत
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी घरी राहून ऑनलाईन अभ्यास करत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात आपल्याला शाळेत जायला मिळेल या अपेक्षेने विद्यार्थी तयारी करून बसले होते. पण कोरोना काळ असल्याने शासनाने पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचाच मार्ग निवडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला पण जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे,पर्यवेक्षिका आशा शिरसाठ, वर्गशिक्षक डी.के. चौधरी, बी.सी.कोळी,महेश पाठक यांना आपल्या घरी आलेले पाहताच विद्यार्थ्यांना आश्चर्य तर वाटलेच परंतु आपल्याला शाळेत जाता येत नाही पण शाळाच आपल्या घरी आल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याहीपेक्षा नवीन वर्गाची नवीकोरी पुस्तके आपल्याला घरपोच मिळाल्याचेही समाधान विद्यार्थ्यांना मिळाले.
पालकांनीही शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे आनंदाने स्वागत केले.