लग्न जुळविणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:30+5:302021-07-18T04:13:30+5:30
पाचोरा : पोलीस ठाण्याच्या परिसरातील घटना पाचोरा : लग्न जुळवून देणाऱ्या पुरुष व महिला दलालांमध्ये दलालीवरूनच हाणामारी झाली. ही ...

लग्न जुळविणाऱ्या
पाचोरा : पोलीस ठाण्याच्या परिसरातील घटना
पाचोरा : लग्न जुळवून देणाऱ्या पुरुष व महिला दलालांमध्ये दलालीवरूनच हाणामारी झाली. ही घटना पाचोरा पोलीस स्टेशनजवळ शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. दलालाकडील मोटारसायकल व मोबाइलही या महिला दलालाने हिसकावून पळ काढला.
शिरपूर येथील मुलाचे दलालांनी नाशिक येथील एका मुलीशी लग्न जुळवून दिले. यासाठी लाखो रुपयांची दलाली घेतली. मुलीस दीड लाख रुपये रोख देण्यात आले.
इकडे लग्नाची वेळ झाली. मात्र, नवरी मेकअपसाठी गेली तर ती परत आलीच नाही. नवरदेव बोहल्यावर वाट पाहत राहिला. पैसे घेऊनही नवरी न आल्याने पाचोरा शहरातील महिला दलाल आणि कुऱ्हाड बुद्रुक, ता. पाचोरा येथील दलाल यांच्या शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करीत हे भांडण सोडविले. महिला ही मुलाकडील तर पुरुष हा मुलीकडून दलाल होता.
वधू मेकअपला गेल्याचे सांगून पळून गेली, असे दलाल महिलेचे म्हणणे होते. त्यामुळे दलालास महिलेने इतर साथीदारांकडून मारहाण केली तसेच त्याची मोटारसायकल व मोबाइल रोख रक्कम हिसकावून तेथून पळ काढला. या घटनेबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.