एड्सबांधितांचा विवाह सोहळा आनंदात पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:16+5:302020-12-03T04:29:16+5:30
आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे यांनी हे आयोजन केले होते. यंदाचे हे त्यांचे १३वे वर्ष होते. ...

एड्सबांधितांचा विवाह सोहळा आनंदात पार
आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे यांनी हे आयोजन केले होते. यंदाचे हे त्यांचे १३वे वर्ष होते. मंगळवारी सायंकाळी हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी आमदार सुरेश भोळे, चोपडा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी आनंदराव वायसिंग, जळगाव येथील शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पुंडलिक सपकाळे यांनी राबविलेल्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. लग्नानंतर आमदार भोळे यांनी या जोडप्यांना गॅस भेट म्हणून दिले, तर गावातील इतर नागरिकांनीही भेटवस्तू दिल्या असल्याचे पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले.