शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो, ती आम्ही जिंकलो : नवनीत राणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 21:18 IST

मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार, राणा यांनी व्यक्त केला विश्वास.

प्रशांत भदाणेमहाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो ती आम्ही जिंकलो आहोत. येणाऱ्या काळात लव जिहादच्या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारू. लव्ह जिहादचा खात्मा करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, अमरावती जिल्ह्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली आहे आणि जळगावत त्याचं जाहीर आव्हान करत असल्याचे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले.

“हनुमान चालीसाचे पठण केलं त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारने तुरूंगात टाकलं होतं, आम्ही निर्दोष होतो तरी आम्हाला १४ दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं. ज्यांचा वध करायचा होता त्याचा वध आम्ही केला आणि त्यांना घरी बसवलं,” अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. अमरावती जिल्ह्यातील ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचं काम सुरू आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी लव्ह जिहादच्या कचाट्यात कुणी सापडले असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना मदत करण्याचे काम करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली. 0आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत, त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचं संकट दूर करणं हा आमचा हेतू होता. मी एक महिला आहे त्याशिवाय २५ लाख लोकांमधून निवडून गेलेली खासदार देखील आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाहीतर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावे लागेल. अजूनही तर सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला.

आता फुलस्टॉप लागणारआताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जीवाचे रान करून काम करत आहेत अशी स्तुती सुमनेही नवनीत राणा यांनी उधळली. गेल्या अडीच वर्षात जेवढे काम झालं नाही, दीड महिन्यातच या सरकारने जीआर काढले. सुरुवात चांगली झाली आहे असेही त्या म्हणाल्या. मुंबई महापालिकेत गेल्या दोन पिढ्यांपासून जे राजकारण सुरू होतं त्याला आता फुल स्टॉप लागणार आहे, रामभक्त आणि हनुमान भक्त हे करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र