शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मतदारसंघ आम्हालाच हवा! शिवसेना शिंदे गटाने ठोकला दावा; आमच्या मनात ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू

By सुनील पाटील | Updated: January 7, 2024 16:17 IST

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे.

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे. सर्वाधिक आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आम्हालाच हवा आहे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करु, ते भाजपच्या श्रेष्ठींशी बोलतील असे सांगून शिंदे गटाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सुनील चौधरी रविवारी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी अजिंठा विश्रामगृहावर प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील आदी उपस्थित होते. या मतदारसंघात आढावा घेतला असता आमदार, नगरसेवक, जि.प.सदस्य आमचे आहे. अनेक संस्था आमच्याकडे आहेत. लोकसभेसाठी आमच्यासाठी पुरक वातावरण आहे. पक्षवाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

भाजप-शिंदे गटात कुरबुरी, पण वाद नाहीप्रत्येक कुटूंबात थोडं अधिक कुरबुरी असतात. तसंच भाजप व शिंदे गटात थोडं रडगाणं, दुजाभाव आहे. मात्र आमच्यात, तक्रारी वाद नाही. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून कुरबुरी दूर करण्याचा प्रयत्न करु. इच्छा प्रकट करणे गैर नाही. आमची मागणी आहे की,जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्हाला द्यावा. काही मतदार संघात भाजप दुसरी टीम तयार करीत आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यात लक्ष घालतील. सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत असल्याचे चौधरी म्हणाले.  

टॅग्स :JalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटील