एरंडोल तालुक्यात कोरोना तडीपार होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:36+5:302021-07-27T04:17:36+5:30
एरंडोल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या शून्यावर स्थिरावली आहे. सोमवारी २६ रोजी कोरोनाची संख्या शून्यावर राखण्याची परंपरा कायम ...

एरंडोल तालुक्यात कोरोना तडीपार होण्याच्या मार्गावर
एरंडोल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या शून्यावर स्थिरावली आहे. सोमवारी २६ रोजी कोरोनाची संख्या शून्यावर राखण्याची परंपरा कायम आहे. ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. विशेष म्हणजे उपचारासाठीही सध्या येथे रुग्ण नसल्याचीच परिस्थिती आहे.
२६ रोजी तालुक्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५६ टक्के आहे. तालुकास्तरीय आरोग्य अधिकारांच्या अहवालातील बहुतांश रकान्यांमध्ये शून्याने जागा व्यापली आहे.
दरम्यान, तालुक्यात आरटीपीसीआर चाचण्या वीस हजार २३९ झाल्या आहेत तर अँटिजन चाचण्या ५२ हजार ४७८ इतक्या झालेल्या आहेत. अजूनही चाचण्या घेण्याचे मोहीम राबवली जात आहे. एकंदरीत कोरोनावर नियंत्रण करण्यात महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, नगरपालिका यंत्रणा, ग्रामपंचायत यंत्रणा यांना यश प्राप्त झाले असल्याचेच चित्र तालुक्यात आहे.