सुकी धरणातील पाणी साठ्याचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST2021-09-08T04:20:58+5:302021-09-08T04:20:58+5:30
लोकसेवक स्व. बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या विद्यार्थीदशेमध्ये एक स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे सुकी नदीवर धरण बांधण्याचे. या ...

सुकी धरणातील पाणी साठ्याचे जलपूजन
लोकसेवक स्व. बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या विद्यार्थीदशेमध्ये एक स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे सुकी नदीवर धरण बांधण्याचे. या भूमीला सुजलाम - सुफलाम करण्याचे ते स्वप्न १९७४ - ७५ साली मंत्रिमंडळात असताना त्यांनी साकार करून दाखवलं. या निमित्तानं या भागाला गंगा प्राप्त झाली. या परिसराचे जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदी राहो आणि सर्वच आदिवासी शेतकरी बांधवांना सुख, समृद्धी आणि शांती मिळो, अशी प्रार्थना या ठिकाणी करूया, असे याप्रसंगी आमदार चौधरी म्हणाले.
याप्रसंगी जि. प. सदस्या सुरेखा पाटील, बापू पाटील, पं. स.चे माजी सभापती यावल लिलाधर चौधरी, युवानेते धनंजय चौधरी, पं. स. सदस्य योगेश सोपान पाटील, सरफराज तडवी, हमीद तडवी, रमेश महाजन, विजय महाजन रोझोदा, तुकाराम बोरोले, किशोर चौधरी (गम्पा शेठ), गुणवंत टोंगळे, गंगाराम नेहते, मुरलीधर राणे, लोहारा सरपंच लियाकत जमादार, मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील, संजय जमादार, मयबूब तडवी, महेंद्र पाटील, हमीद भायखा, जावेद जनाब तडवी, देविदास हडपे, संजय चौधरी, सुधाकर झोपे, जितेंद्र पाटील, उपसरपंच रोझोदा दीपक धांडे, कामिल तडवी, पिंटू पवार, चंद्रकांत भंगाळे, अनिल लढे, सुनील फिरके, सुनील कोंडे, डॉ. राजेंद्र पाटील, योगेश पाटील, योगेश चौधरी, हेमंत चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, गंभीर तडवी, आर. के. चौधरी, पत्रकार संतोष नवले, भरत कुवर, संतोष बंजारा, पोलीस देवेंद्र पाटील, पोलीस मेहरबान तडवी, परिसरातील शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो-सुकी धरणाचे जलपूजन करतांना आमदार शिरीष चौधरी, जि. प. सदस्या सुरेखा पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील व कार्यकर्ते मित्रमंडळी.
(फोटो - योगेश सैतवाल, सावखेडा)०८सीडीजे ४