जामनेरात पाण्याची टाकी कोसळली!
By Admin | Updated: October 26, 2015 00:50 IST2015-10-26T00:50:59+5:302015-10-26T00:50:59+5:30
जामनेर : शहरातील आठवडे बाजार आवारातील सुमारे 50 वर्षापूर्वी बांधलेली 3 लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी (जलकुंभ) रात्री अकराच्या सुमारास अचानक कोसळली.

जामनेरात पाण्याची टाकी कोसळली!
जामनेर : शहरातील आठवडे बाजार आवारातील सुमारे 50 वर्षापूर्वी बांधलेली 3 लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी (जलकुंभ) रात्री अकराच्या सुमारास अचानक कोसळली. पाण्याची टाकी कोसळताच मोठा कानठळ्या बसणारा स्फोट झाल्याने शहरात घबराट पसरी. सवर ट्रान्सफार्मर अचानक बंद पाण्याची टाकी कोसळताच शहरातील सर्व प्रमुख ट्रान्सफार्मर उडाले आणि बंद पडल्याने शहरातील वीज खंडित होऊन सर्वदूर अंधार पसरला आणि जनतेमध्ये भूकंप झाल्याचा भास झाला होता. पाण्याची टाकी कोसळली त्या ठिकाणी गोळा होण्यास सुरूवात झाली. लागलीच पोलीस कुमक येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत करीत आहेत.