तळोद्यात पाणीटंचाईचे संकट
By Admin | Updated: December 29, 2015 00:08 IST2015-12-29T00:08:41+5:302015-12-29T00:08:41+5:30
हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तळोद्यात पाणीटंचाईचे संकट
तळोदा : शहरातील हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराचा विस्तार वाढल्यानंतर नवीन वसाहती निर्माण झाल्या. त्यातीलच शहराच्या पूव्रेला शहादा रस्त्यावरील हरकलालनगर या वसाहतीचाही समावेश आहे. या वसाहतीत सुमारे 250-300 कुटुंब रहिवास करतात. या वसाहतीत निम्म्या ठिकाणी नळ कनेक्शन आहेत. परंतु ज्यांच्याकडे पालिकेचे नळ कनेक्शन नाहीत त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या या वसाहतीतील नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिका:यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हरकलालनगरातील निम्म्या नागरिकांना पालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. मात्र निम्म्या भागात पालिकेचे पाणी मिळत नाही. पाणी मिळत नसल्याने या कॉलनीतील निम्म्या नागरिकांना आर्थिक भरुदड सहन करीत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागातील नागरिक खासगी कूपनलिकाधारकांकडून पाणी विकत घेऊन आपले काम भागवत आहेत. खासगी कूपनलिकांमध्येही काही बिघाड झाल्यास पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. निम्म्या भागात पालिकेने पाणीटंचाई निवारणासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यासाठी या भागात पालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी जोडण्या देऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर प्रा. आर. ओ. मगरे, महेंद्र सूर्यवंशी, डी.एम. महाले, श्यामसिंग राजपूत, एन.पी. पाटोळे, बन्सी माळी, हरचंद केदार, रूपसिंग पाडवी, एन.पी. पाटोळे, एस.व्ही. अहिरे, प्रा. बी.एस. भामरे, कालीदास एस. वाणी, बी. जी. सूर्यवंशी, के. के. वाणी, सुनील सागर, जितेंद्र शर्मा, उमाकांत परदेशी, पंकज मोरे आदी नागरिकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)