शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

नशिराबादच्या पाणी योजनेबाबत टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 13:07 IST

ग्रामस्थांची गैरसोय

ठळक मुद्देउन्हाळा संपला तरी योजनेची चाचणी सुरूनियोजनाचा फज्जा उडाला

आॅनलाइन लोकमतनशिराबाद, जि. जळगाव, दि. १ - वर्षानुवर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असला तरी अद्यापही नशिराबादकर पाण्यासाठी शापितच ठरल्यागत आहे. पाणी टंचाईची बोंबाबोंब होऊनही उदासीन शासन व अधिकाऱ्यांनी मात्र पाणी योजनेबाबत ग्रामस्थांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. मे महिना संपला तरीही योजनेची अद्याप चाचणीच सुरू आहे. उन्हाळा जवळपास संपला तरी ग्रामस्थांची तहान भागली नाही. येत्या आठवडाभरात योजनेचे शुद्ध पाणी मिळणार असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात योजनेचे पाणी मिळेल तो दिवस उजाडण्याची सर्वच जण वाट पाहत आहे.गावाला पाणीपुरवठा करणाºया जलस्त्रोतांची पातळी खोलवर गेल्याने व ठोस पर्यायी योजनाही नसल्याने येथे जानेवारीपासून टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. आतापर्यंत १० ते १३ दिवसाआड झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वच हैराण आहे.नशिराबादला पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. योजना सुरू होण्याबाबत आश्वासने व तारीख पे तारीख मिळाली. हतबल झालेले ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. मात्र संबंधित विभागाने सहानुभूतीपूर्वक आठवडाभरात पाणी सुरू होईल, अशी विनंती करीत आंदोलनाला स्थगिती दिली. त्यानंतर पंप दुरुस्ती, बसविणे आदी कामे सुरू असल्याचे सांगत मे महिन्याचा पंधरवाडा लोटला अन् त्यानंतर चाचणी सुरू झाली. त्यातही पाईपलाईन फुटल्याने पुन्हा खोडा आला. मे अखेर नशिराबादला योजनेच्या ठिकाणी पाणी पोहचले. अद्याप चाचणीच सुरू असल्याने शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थ तहानलेलेच आहे. उन्हाळा संपला मात्र पाणी योजनेची प्रतिक्षा कायमच असल्याचे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. जीव गेल्यावर शुद्ध पाणी देणार काय? असा संतप्त प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.दरम्यान पाणी समस्येवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली. त्यामुळे वाघूरचे आवर्तन सुटल्यानेच टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. वाघूरच्या आवर्तनाने तरले हे मात्र तितकेच खरे.नियोजनाचा फज्जा उडालावाघूर बेळी, मुर्दापूर धरण व स्थानिक जलस्त्रोतातून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र त्याची भूजल पातळी कमी झाल्याने टंचाईची तीव्रता वाढली व पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अद्यापपर्यंत ठोस उपाययोजनाच कार्यान्वित नसल्याने नशिराबादकरांना टंचाईचा सामना करावाच लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईच्या तीव्रतेवर मात होईल तसे नियोजन असल्याचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शेळगाव बॅरेजची जलशुद्धीकरण योजनाच अद्यापही कार्यान्वित न झाल्याने व एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगा न निघाल्याने सर्वच नियोजनाचा फज्जा उडाला.पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने परिपूर्ण प्रयत्न केले. बोरींग करून पाणीपुरवठा सुरळीत केला. मात्र जलस्त्रोतच आटल्याने टंचाई वाढली. त्यातच एमआयडीसी पाणीप्रश्नी तोडगाच निघाला नाही. पाणी योजनेकामी अधिकाºयांनी दिशाभूल केली त्यामुळे योजना कार्यान्वितेची प्रतिक्षा आहे.-विकास पाटील, सरपंच.पाणी योजनेच्या चाचणीचे काम सुरू आहे. नशिराबादला जलशुद्धीकरण ठिकाणी पाणी आले असून चाचणी कार्यात आढळलेल्या त्रुटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या ४ ते ५ दिवसात योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल.-एस.सी.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्र.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव