शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई निवारार्थची दोन कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:45 IST

दोन महिने उलटूनही कामे पूर्ण होईना

ठळक मुद्दे५९ गावांमध्ये ५९ कामे प्रस्तावितपिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - पाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यामध्ये विहिर खोलीकरण, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, विशेष दुरुस्ती अंतर्गत ५९ गावांमध्ये ५९ कामे प्रस्तावित असून अंदाजपत्रकीय किंमतीनुसार त्यांचा एकूण खर्च २ कोटी ४२ लाख ४३ हजार ९३४ रुपये असून या कामांना अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने ही कामे सुरूच झाली नसल्याचे चित्र आहे.जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जिल्ह्यात विहिर खोलीकरण व तात्पुरता पाणी पुरवठ्यासह एकूण २० कामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून यात केवळ दोनच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच एकूण ६२ गावांमध्ये १६७ विंधन विहीरींच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यातील केवळ १४ कामे झाली असून १५३ विहिरींचे कामे अद्यापही सुरूच आहेत. कुपनलिकांसाठी १५ गावांमध्ये ३६ कामे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ दोनच कामे झालेली असून ३४ कुपनलिकांची कामे सुरू आहेत. उन्हाळ््याची दोन महिने उलटले तरी अद्यापही टंचाई निवारणाची कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.८८९ गावे पाणी टंचाईच्या छायेतजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टप्पा -२ मध्ये ५७ कोटी ९८ लाख निधीतून ५५७ कामे घेण्यात आली असून त्यापैकी ५४२ कामे पूर्ण होऊन जिल्ह्यातील ३ हजार ५५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. असे असले तरी टंचाईची समस्या कायम असून ८८९ गावे पाणी टंचाईच्या छायेत आहेत. सद्यस्थितीत ७७ गावांमध्ये ४१ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सिंचनाची कामे केवळ कागदोपत्री झाली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.१३६ विहिरी अधिग्रहीतजिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १३८ गावांमध्ये १३६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे.पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीरजिल्हा परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल २९ कोटी ५० लाखांचा आराखडा पाठविला. एप्रिल ते जून या दरम्यान २७१ गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अमळनेर तालुक्यात सद्यस्थितीत सर्वाधिक ४१ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या तालुक्यात १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जामनेर तालुक्यात १८ गावांना १३ टँकरव्दारे, भुसावळ - १ टँकर, बोदवड -१, पाचोरा -१, चाळीसगाव - १, पारोळा - ६ टँकर असे एकूण ७७ गावांमध्ये ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव