खेडगाव नंदीचे गावात शिरले पाणी... घरात पाणीच पाणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:57+5:302021-09-08T04:22:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खडकदेवळा, ता.पाचोरा : पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला जणू महापूर आला. ...

खेडगाव नंदीचे गावात शिरले पाणी... घरात पाणीच पाणी...
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकदेवळा, ता.पाचोरा : पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला जणू महापूर आला. त्यामुळे पुराचे पाणी बऱ्याच लोकांच्या घरात शिरून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतीचे व घरामध्ये पाणी शिरल्यामुळे भरपूर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे, तसेच बहुळा धरणावरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाइपलाइनही या पुरात वाहून गेली. त्यामुळे खेडगाव नंदीचे गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. आमदार किशोर पाटील हे मुंबईमध्ये बाहेरगावी असल्याने, त्यांनी यावेळी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांना घटनास्थळावर माहिती घेण्यासाठी पाठविले. यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
पाचोरा तालुक्यात सोमवार रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील अनेक नदी नालेही पुरामुळे ओसांडून वाहू लागले आहेत. त्यातच खेडगाव (नंदीचे) येथील उतावळी नदीला पूर आल्याने, पुराचे पाणी हे खेडगाव नंदीचे येथील अनेक नागरिकांच्या घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सद्यस्थितीतही परिसरात ढगाळ वातावरण असल्याने, रात्री मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रात्रभर पाऊस झाल्यास खेडगाव (नंदीचे), तसेच उतावळी नदी काठावरील गावांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
गावात शिरले पुराचे पाणी
पाचोरा तालुक्यात खेडगाव नंदीचे गावात उतावळी नदीला पहिल्यांदा पूर आल्याने गावातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे भरपूर नुकसान झाले आहे. यावेळी म्हैस, बकरी, घरातील संसारोपयोगी साहित्य, पाण्याची मोटर, पाण्याची टाकी, कोंबड्या, सायकल, मंडप, खाट, तसेच खेडगाव नंदीचे गावातील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनही या पुरात वाहून गेली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील यांनी सांगितले.
070921\2055-img-20210907-wa0037.jpg
खेडगाव नंदीचे गावात शिरले पाणी... घरात पाणीच पाणी..*
*घरातून अनेक जीवनावश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्या..*
*खेडगाव नंदीचे गावातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन गेली पुरात वाहून ...*