अमळनेर तालुक्यातही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 03:53 PM2019-08-09T15:53:50+5:302019-08-09T15:58:45+5:30

तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत.

Water crisis in Amalner taluka | अमळनेर तालुक्यातही जलसंकट

अमळनेर तालुक्यातही जलसंकट

googlenewsNext
ठळक मुद्देअमळनेरात तीन पुलांची वाहतूक बंद, आपत्ती पथक सज्जसावखेडा, बेटावद , वालखेडा पूल बंदअमळनेर तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन पथक केले रवानाजिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचनासर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. बेटावदजवळील पुलालाही, सावखेडा, मुडी वालखेडा धोका असल्याने चोपडा, शिंदखेडा, शिरपूर, सोनगीर, नंदुरबारकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पांझरा नदीतून ५९ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे तर तापी नदीला दीड लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, संततधार पावसाने नालेदेखील वाहू लागले आहेत. यामुळे तापी नदी पाणी स्वीकारणार नाही, बॅकवॉटरमुळे पांझरा काठावरील मांडळ कलंबू, बाम्हणे, भिलाली, मुडी, बोदर्डे, शहापूर, तांदळी आदी गावांना धोका संभवतो. गावात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तहसीलदार देवरे यांनी १२ पथके तयार करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर केली आहे. जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींना गावातच थांबण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तालुक्याची आपत्कालीन समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यात तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बांधकाम विभाग अभियंता, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याचे प्रमुख म्हणून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, तर आपत्कालीन मदत कक्षाचे प्रमुख म्हणून निवासी नायब तहसीलदार बी.डी.धिवरे यांची नियुक्ती केली आहे.
अनेक ठिकाणी घरे पडली
पातोंडा, बोडर्डे, लोणसीम, लोण चारम तांडा, वावडे, जळोद , शहापूर, बोहरा या गावांना सुमारे १५ घरे पडली आहेत. घरांना ३२०० ते५२०० तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे
तीन गावांना वेढ्याची शक्यता
तापी काठावरील कलाली, बोहरा , सात्री आदी गावांना वेढा पडण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी पथक सज्ज ठेवले आहे.
तीन पूल बंद
तालुक्यातील मुडी वालखेडा पूल वाहून गेल्याने सोनगीर, दोंडाईचा वाहतूक बंद झाली आहे. बेटावद येथील पुलालाही धोका असल्याने त्यावरील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबार वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर तापी नदीवरील सावखेडा पुलालाही धोका आहे. यामुळे चोपडा, यावल, रावेर, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
बैठकीस पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, एपीआय राहुल फुला, अजयकुमार नष्टे, सुनील मोरे, डी.पी.गांगोडे दुय्यम, डॉ.प्रकाश ताडे, डॉ.विलास महाजन, डॉ.भोई, एस.डी.सूर्यवंशी, बी.व्ही. वारे, संजय चौधरी, पी.डी.धनगर, आर.बी.मंडलिक, एस.एम.गवळी, एस.एम.कुलकर्णी, आर.आर.गांगुर्डे, डी.एस. बाविस्कर, हर्षवर्धन मोरे, पी.एस.पाटील, एन.जी.कोचुरे, डी.पी.बोरसे, एस.जी.पंचभाई, सु.श.मुदिराज, बी.सी.अहिरे, धीरज देशमुख, एन.डी.धनराळे, नी.वा.जाधव, एस.आर.भोसले, एस.के.आढाव, आर.जी.गरुड, संजय पाटील, जितू ठाकूर, वाय.व्ही.पगारे आदी उपस्थित होते.

Web Title: Water crisis in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.