मिराबाईनगरात घरांमध्ये शिरले पाणी
By Admin | Updated: September 19, 2015 00:38 IST2015-09-19T00:38:31+5:302015-09-19T00:38:31+5:30
नागरिकांचे हाल : नाल्यांची साफसफाई न केल्याने ठिकठिकाणी तुंबले पाणी

मिराबाईनगरात घरांमध्ये शिरले पाणी
जळगाव- शहरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने पिंप्राळा परिसरातील मिराबाईनगरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले. परिणामी रहिवाशांनी रात्र जागून काढली. महापालिकेने नाले सफाईकडे दुर्लक्ष केल्याने नाल्यातील पाणी तुंबले व नाल्याच्या काठावरील घरांमध्ये ते शिरले.