भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर पाणी
By Admin | Updated: October 16, 2015 00:43 IST2015-10-16T00:43:02+5:302015-10-16T00:43:02+5:30
महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. पण खान्देश विकास आघाडीच्या शिलेदारांनी या फोडाफोडीवर पाणी फिरविले.

भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर पाणी
जळगाव : महापालिकेत महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी भाजपाकडून बुधवारी मध्यरात्रीपासून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. पण मेहरूणमधील खान्देश विकास आघाडीच्या शिलेदारांनी या फोडाफोडीवर पाणी फिरविले. या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचाच महिला व बाल कल्याण समिती सभापती होईल असा शब्द भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना दिला होता. पण या समितीमध्ये राष्ट्रवादी व भाजपा मिळून फक्त तीन सदस्य होते. तर मनसे व खान्देश विकास आघाडीचे (खाविआ) मिळून सहा सदस्य आहेत. यामुळे फोडाफोडी केल्याशिवाय भाजपासमोर पर्याय नव्हता. वरिष्ठ नेत्याकडून प्रय} आपण समर्थन दिलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करावे यासाठी खाविआच्या दोन नगरसेवकांना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने फोन केले. तसेच भाजपाचे लोकप्रतिनिधी या नगरसेवकांना बुधवारी रात्री वैयक्तिक भेटूनही आले. खाविआने खिंड लढविली समोरून फोडाफोडीचे राजकारण प्रतिष्ठेचे झाले होते. दुस:या बाजूला खाविआच्या नगरसेवकांनी खिंड लढविली. ज्यांना भाजपाने गळ घातला होता त्यांनी नकार दिल्याने भाजपाचे प्रयत्न अपयशी ठरले. बैठकांचा धडाका राष्ट्रवादी व भाजपाच्या बैठका एका शासकीय विश्रामगृहात सुरू होत्या. तर खाविआचे नगरसेवक शहरातील एका लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी एकत्र आले होते. सकाळी 11 वाजेर्पयत या बैठका सुरू होत्या. एक नगरसेवक गळाला भाजपाने एका नगरसेवकाला आपल्या बाजूने खेचले . पण तसे करूनही बाल कल्याण समितीमध्ये संख्याबळाचा खेळ जुळला नाही. मतदान झाले तर आपटी बसेल व नाचक्की होईल या भीतीने शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शोभा बारी यांनी माघार घेतली.