पहूरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 17:44 IST2017-08-25T17:42:14+5:302017-08-25T17:44:58+5:30

पहूर परिसरात गेल्या महिन्यापासून चो:यांचे सत्र सुरूच असून पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे संताप व्यक्त होत आहे.

In the watchtower, three shops were broken one night | पहूरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

पहूरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

ठळक मुद्देचो:यांचे सत्र सुरूच : 75 हजाराचे दागिने लंपास, दुकानात केली नासधूस, पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचाही प्रय} पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह

पहूर ता. जळगाव :  येथे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले चोरीचे सत्र थांबता थांबत नसून गुरूवारी मध्यरात्रीनंतर दोन सराफा दुकानांसह एक कृषी केंद्र अशी तीन दुकाने चोरटय़ांनी फोडून 75 हजारांचा ऐवज लंपास केला. सराफा दुकानात डल्ला मारतांना चोरटय़ांनी तेथे उच्छाद मांडत एक लाखाच्या साहित्याचे नुकसानदेखील केले आहे. एका पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचाही प्रय} झाल्याने चोरटय़ांना पोलिसांचा धाक वाटेनासा झाल्याच्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
चार दुकानांना केले लक्ष्य
फोडण्यात आलेली ही सर्व दुकाने जळगाव राज्य महामार्गाला लागून आहेत. चोरटय़ांनी अगोदर ईश्वर ज्वेलर्स या दुकानात हात मारला. तेथून सोन्याची मोड, किरकोळ दागिने आणि चांदीचे भांडे  असा 75 हजारांचा ऐवज लंपास केला. एवढय़ावरच हे चोरटे थांबले नाहीत तर त्यांनी या  दुकानात हैदोस घालूून तब्बल एक लाखाच्या साहित्याची नासूधूस केली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही पळवून नेले आहे. नंतर त्यांनी भारत माता पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचा प्रय} केला परंतु तो अयशस्वी झाला. नंतर बालाजी ज्वेलर्समध्ये शिरकाव केला तेथेही त्यांना काहीही हाती लागले नाही. शेवटी गरूड कृषी केंद्राला फोडून तेथून दीड हजाराची रोकड लंपास केली.  एकाच रात्रीत झालेल्या या चो:यांनी नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
गेल्या सव्वा महिन्यापासून पहूर परिसरात चोरीच्या लागोपाठ घटना घडत असून पोलिसांना चोरटय़ांनी जणू आव्हान दिले आहे.

Web Title: In the watchtower, three shops were broken one night